मोदी@9 महासंपर्क अभियान नागरिक भेटी दरम्यान, मोदी सरकारच्या लोकप्रियतेची पावती क्षणोक्षणी मिळत होती – चंद्रकांत पाटील

पुणे: देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाची कारकीर्द पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने मोदी@9 हे महासंपर्क अभियान संपूर्ण देशभरात सुरू आहे. या माध्यमातून मोदींच्या नेतृत्वात सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्वा अंतर्गत केलेले उपक्रम भाजपाच्या वतीने लोकांपर्यंत या संपर्क अभियानाच्या माध्यमातून पोहोचविले जात आहे.
या मोदी @ 9 महासंपर्क अभियानांतर्गत आज कोथरूडचे आमदार तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघामधील नागरिकांच्या थेट घरी जाऊन भेटी घेतल्या. या भेटीदरम्यान देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या गेल्या ९ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या कामगिरीची माहिती दिल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच या भेटी-गाठीदरम्यान मा. मोदी सरकारच्या लोकप्रियतेची पावती क्षणोक्षणी मिळत होती असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.