अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रसंगी दोषींवर मोक्काप्रमाणे कलमं लावून, कठोर कारवाई करा, चंद्रकांत पाटलांचे पोलीस प्रशासनाला निर्देश
पुणे: पुण्यात भरदिवसा तरुणीवर झालेल्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत असताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या घटनेची तत्काळ दखल घेत असे प्रकार थांबविण्यासाठी पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
याबाबत केलेल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये पाटील म्हणाले की “पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात आज सकाळी तरुणीवर हल्ला करण्यात आला. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या तरुणीला वाचवण्यात स्थानिक तरुण लेशपाल जवळगे याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि आरोपीला पोलीसांच्या ताब्यात दिले. लेशपालचे मनापासून आभार! शासनाने महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. असे प्रकार थांबविण्यासाठी कठोर कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. तसेच अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रसंगी दोषींवर मोक्काप्रमाणे कलमं लावून, गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत