संत महंतांच्या अभंग आणि भजनांनी सारं वातावरण भक्तीमय, आनंद कंद कार्यक्रमात चंद्रकांत पाटील विठ्ठल भक्तित तल्लीन
पुणे : आज आषाढी एकादशी निमित्त कोथरूड व्यासपीठाच्या वतीने विठ्ठल नामाच्या जयघोषासाठी आनंदकंद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली.
यावेळी पाटील यांच्यासमवेत उपस्थितांनी प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे, हेमंत पेंडसे, मनिषा निश्चल यांनी सादर केलेल्या अभंगांचा आनंद घेतला.
“संत महंतांच्या अभंग आणि भजनांनी सारं वातावरण भक्तीमय झालं होतं. या कार्यक्रमास उपस्थित राहून विठ्ठल भक्तीत तल्लीन झालो. अशा भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.