चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या 4233 लाभार्थ्यांना 3.75 कोटी रकमेचा व्याज परतावा वितरित

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयास भेट दिली.
या भेटी दरम्यान 4233 लाभार्थ्यांना 3.75 कोटी रकमेचा व्याज परतावा एका क्लिकव्दारे वितरित करण्यात आला असल्याची माहिती पाटील यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातुन दिली. या सोबतच महामंडळाच्या वतीने आजपर्यंत एकूण 61,411 लाभार्थ्यांना व्यवसायासाठी बँकेकडून 4337 कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले व एकूण 457 कोटीचा व्याज परतावा देण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते उपस्थित होते.