स्नातकांनी घेतलेल्या शिक्षणावर न थांबता विद्यापीठाचे नाव उज्वल करण्यासाठी विविध क्षेत्रात काम करावे, चंद्रकांत पाटलांचे आवाहन

12

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२२ वा पदवीप्रदान समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करुन संपन्न झाला. यावेळी बैस यांनी ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

स्नातकांच्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणातून मिळालेले श्रेयांक (क्रेडीट) आपल्या क्रेडीट बँकेत जमा व्हावेत आणि नंतरच्या शिक्षणासाठी ते उपयोगी ठरावेत, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे स्नातकांनी घेतलेल्या शिक्षणावर न थांबता विद्यापीठाचे नाव उज्वल करण्यासाठी विविध क्षेत्रात काम करावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

यावेळी पदवीप्रदान समारंभात एप्रिल-मे २००२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. तसेच राज्यपाल श्री.बैस, सचिव श्री. गोखले आणि चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष कामगिरीसाठी देण्यात येणारी सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाला भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ.राजेश गोखले, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य, अधिसभा सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापरिषदेचे सदस्य, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.