पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी घेतला सर्व विभागाशी संबंधित प्रश्नांच्या संदर्भात कार्यवाहीचा आढावा

28

मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये सभागृहात सन्माननीय सदस्यांकडून विविध आयुधांद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नांसंदर्भात बैठक झाली.

या बैठकीत सभागृहात उपस्थित केलेल्या कृषी व पदुम, गृह, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण, महसूल व वन ,मदत व पुनर्वसन, उद्योग, ऊर्जा, जलसंपदा, महिला बाल विकास आणि इतर ही सर्व विभागाशी संबंधित प्रश्नांसंदर्भात कार्यवाहीचा आढावा घेतला पाटील यांनी घेतला.

यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.