एसएनडीटी महिला विद्यापीठाचे केंद्रीय विद्यापीठ व्हावे यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

54

मुंबई : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 108 वा वर्धापन दिन सोहळा नुकताच चर्चगेट मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिला दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका आत्मविश्वासाने पार पाडतात. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रम विकसित करून महिला सक्षमीकरणासाठी अधिक प्रोत्साहन द्यावे. या महिला विद्यापीठाचे केंद्रीय विद्यापीठ व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी या विद्यापीठाच्या 108 व्या स्थापना दिनानिमित्त अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी कुलगुरू उज्वला चक्रदेव यांनी विद्यापीठाचे सादरीकरण करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दरम्यान विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीवरील लघुपट दाखवण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने करण्यात आली.

या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य व वन मंत्री सुधारी मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरू डॉ.रुबी ओझा, कुलसचिव विलास नांदवडेकर, जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, एसएनडीटीचे विभागप्रमुख, प्राध्यापक शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व इतरही मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.