वसतिगृहातील अधिक्षकांनी मुलींचे आपण पालक म्हणून जबाबदारी स्विकारावी,चंद्रकांत पाटील यांनी केले आवाहन

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय वसतिगृहातील अधिक्षकांसाठी आज सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय येथे प्रशिक्षण आणि प्रेरणादायी कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पाटील यांनी वसतिगृहातील अधिक्षकांनी मुलींचे आपण पालक म्हणून जबाबदारी स्विकारावी असे आवाहन पाटील यांनी केले. आयोजकांच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्रजी रस्तोगी , उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्रजी देवळाणकर , तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोदजी मोहितकर, आयपीएस डॉ.रश्मीजी करंदीकर, सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक, राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहातील अधिक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते.