विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दाखल होणाऱ्या सर्व सदस्यांचे संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले स्वागत
मुंबई : आज शिंदे – फडणवीस – पवार या महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस. महाराष्ट्राचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आपल्या दिवसाची सुरवातीस विधानभवन येथील दालनातील गणेश मूर्तीचे पूजन करून आशीर्वाद घेतले. संसदीय कार्यमंत्री म्हणून अधिवेशन निर्विघ्न पार पडो, अशी प्रार्थनाह यावेळी पाटील यांनी विघ्नहर्ता गणराया चरणी करून कामकाजाची सुरुवात केली.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दाखल होणाऱ्या सर्व सदस्यांचे संसदीय कार्य मंत्री पाटील यांनी स्वागत केले. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुलजी नार्वेकर, उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांचे केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर लिखित “भारत मार्ग” हे पुस्तक देऊन स्वागत केले.
तसेच, अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पडावे, जनतेचे प्रश्न सुटावेत व या अधिवेशनातील प्रस्तावित विधेयके अधिकाधिक मंजूर व्हावीत, यासाठी पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
