पश्चिम महाराष्ट्रातील नवनियुक्त जिल्हाध्यक्षांनी घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट
मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्हा आणि शहराच्या नवनियुक्त अध्यक्षांची यादी जाहीर केली. अनेक नवीन आणि युवा चेहऱ्यांना यामध्ये स्थान देण्यात आले आहे.
यापार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर ग्रामीण पश्चिमचे श्री.राहुल बजरंग देसाई, कोल्हापूर हातकणंगले पूर्वचे राजवर्धन रामराजे विठ्ठलराव निंबाळकर या नवनियुक्त भाजपा जिल्हाध्यक्षांनी राजे समरजितसिंह घाटगे यांच्या समवेत तर सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील ज्ञानदेव कदम, पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष शंकर जगताप यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली.
यावेळी पाटील यांनी सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
