कोल्हापूरमध्ये लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या खेळघर उपक्रमातून ज्ञानदानाचे कार्य असेच निरंतर सुरू रहावे अशी अपेक्षा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनक्षमता विकसित करणे आणि औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक शिक्षणकृतीची जोड देणे, या हेतूने कोल्हापूरमध्ये लोकसहभागातून खेळघर उपक्रम राबवला जातो. या उपक्रमात चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी माहित दिली कि , आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनक्षमता विकसित करणे आणि औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक शिक्षणकृतीची जोड देणे, या हेतूने कोल्हापूरमध्ये लोकसहभागातून खेळघर उपक्रम राबवला जातो. सदर उपक्रमात एकूण ७७ वर्ग कार्यान्वित असून १३०० पेक्षा जास्त मुलं शिक्षण घेत आहेत. या खेळघराचा विस्तार आज संपूर्ण कोल्हापूर शहरात झाला असल्याचे पाटील म्हणाले.
या उपक्रमातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ज्ञानदानाचे हे कार्य असेच निरंतर सुरू रहावे अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.