कोथरुडकरांनी अनुभवला ‘द व्हॅक्सिन वॉरचा’ थरार , नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मोफत स्क्रिनिंग

पुणे : कोविड महामारीची दहशत संपूर्ण जगाने अनुभवली. या महासंकटातून संपूर्ण मानव जातीला बाहेर काढण्याचे काम आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी केले. यावर आधारित विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडकरांसाठी द व्हॅक्सिन वॉर सिनेमाच्या मोफत आयोजन करण्यात आले होते. याचा कोथरुडकरांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेत व्हॉक्सिन तयार करण्याचा थरार अनुभवला.
सन २०२० पासून सलग दोन वर्षे संपूर्ण जगाने कोरोनाचं महाभयंकर रूप पाहिलं. जगभरात धुमाकूळ घातलेल्या या महामारीने सगळ्यांनाच हादरवून सोडलं होतं. एकीकडे डॉक्टर्स या विषाणूशी लढा देत असताना वैज्ञानिक मात्र या विषाणूला नष्ट करणारी लस शोधण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करत होते. याचं चित्रण ‘द व्हॅक्सिन वॉर’ या सिनेमात करण्यात आलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही या सिनेमाचं कौतुक केलं होतं.
कोविड विरुद्धचा लढा आणि यापासून मानव जातीला बाहेर काढण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांची प्रयत्नांची शर्थ सर्वांना समजावी यासाठी कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाचे कोथरुडकरांसाठी मोफत स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास दहा हजार कोथरुडकरांनी याचा लाभ घेत ‘द व्हॉक्सिन वॉर’चा थरार अनुभवला.
दरम्यान, सिनेमा पाहून सद्गदित झालेल्या अनेकांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानताना, हा सिनेमा शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ही दाखविण्याची विनंती केली.