उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली जलतरंग वादक श्री. मिलिंद तुळाणकर यांची भेट

पुणे : संगीत क्षेत्रातील जलतरंगांचा जादूगार. अर्धगोलात ठेवलेले लहानमोठ्या आकाराचे चिनी मातीचे बाऊल, त्यात कमीअधिक प्रमाणात असलेलं पाणी आणि दोन नायलॉनच्या स्टिक्स एवढ्या सामग्रीवर उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे श्री. मिलिंद तुळाणकर म्हणजे संगीत क्षेत्रातील अवलियाच म्हणावं लागेल. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज त्यांची भेट घेतली.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, पंडित शंकर कान्होरे यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन आज मिलिंदजी संपूर्ण जगाला आपल्या अद्भूत प्रतिभेने मंत्रमुग्ध करत आहेत. आज त्यांच्या कलेची जादू सर्वदूर पोहोचली आहे की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजधानी दिल्लीत आयोजित जी-२० च्या परिषदेत मिलिंदजींना आपली कला सादर करण्याची संधी दिली. मिलिंदजींनीही मिळालेल्या संधीचं सोनं करुन पंतप्रधान मोदीजींसह जी-२० साठी आलेल्या सर्व पाहुण्यांना मंत्रमुग्ध केलं. विशेष म्हणजे, मिलिंदजी केवळ जलतरंगांचे साधक आहेत असे नाही; तर संवादिनी, तबला, संतूर यांसह चित्रकलेसारख्या केलेची जोपासना करतात.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आमच्या आजच्या भेटीत त्यांनी रेखाटलेली परम पूजनीय डॉ. हेडगेवार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची चित्रे पाहून प्रचंड आनंद झाला. विशेष म्हणजे माननीय मोदीजींनी आपल्या वाढदिवसादिनी अशा अलौकिक व्यक्तिमत्वाला बोलावून त्यांचा गौरव केला. अशा कलासाधकाला आज भेटून मनापासून आनंद झाला असल्याचे पाटील म्हणाले