स्व.विनायकआबा निम्हण यांच्या स्मृतिदिनानिमित्त , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ३६८ विद्यार्थ्यांना ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ प्रदान

33
पुणे : स्व.विनायकआबा निम्हण यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने पुणे शहरात शिक्षण घेत असलेल्या ३६८ विद्यार्थ्यांना ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे हा शिष्यवृत्ती प्रदान सोहळा रंगला होता. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आबांना श्रद्धांजली वाहिली, तसेच शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
आपल्या देशाची तरुण पिढी अतिशय हुशार आणि कर्तृत्ववान आहे. जगभरातील अनेक नामांकित कंपन्यांच्या सीईओपदी भारतीय व्यक्तीच आहेत. त्यामुळे संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. अशाप्रकारच्या उपक्रमातून कर्तृत्ववान ध्येयवादी तरुणांना बळ मिळते, अशी भावना चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
हा सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे रंगला होता. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर,आमदार सिद्धार्थ शिरोळे,आमदार अतुल बेनके, आमदार सत्यजीत तांबे, माजी मंञी सुरेश नवले सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब मुजुमदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, वास्तुविशारद ख्रिस्तोफर बेनिंजर हे उपस्थित होते.
आबांच्या स्मृतिदिनी या ३६८ विद्यार्थ्यांना ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ सोमेश्वर फाऊंडेशन च्या माध्यमातून दिली. या शिष्यवृत्तीमुळे गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठा हातभार लागत आहे. स्व. आबांनी कायमचा लोकहितासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.

Get real time updates directly on you device, subscribe now.