आशियाई पॅरा गेम्समध्ये १०० पदकांचा टप्पा गाठणे हा आनंदाचा आणि कर्तृत्वाचा क्षण – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, २८ ऑक्टोबर : चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला. भारतीय खेळाडूंनी १०० नंबरचा टप्पा पार करत एकूंण १११ पदकांची कमाई केली आहे. आशियाई पॅरा गेम्समध्ये १०० पदकांचा टप्पा गाठणे हा निव्वळ आनंदाचा आणि कर्तृत्वाचा क्षण आहे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पाटील यांनी पुढे म्हटले कि, हे आमच्या अपवादात्मक ऍथलेटिक्ससहसांनी असे कौशल्य , समर्पण आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे.