जागतिक स्तरावर उपयुक्त ठरणारे तंत्रशिक्षण देण्याचा प्रयत्न-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानुबेन नानावटी वास्तुशास्त्र महिला महाविद्यालयात आयोजित ‘पश्चिम महाराष्ट्र विकास मंथन’ मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाटील यांनी भौगोलिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून या सुंदर प्रदेशाच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली.
यावेळी सहकारी राधाकृष्ण विखे पाटील , उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, बाळासाहेब चौधरी, सीआयआयचे प्रतिनिधी अमित घैसास, स्पार्कचे महेश पोहनेरकर आदी उपस्थित होते.
नव्या शैक्षणिक धोरणात देशाचा इतिहास, मातृभाषेतून शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण, व्यक्तिमत्व विकास या पैलूंवर भर देण्यात येत आहे. राज्यातील सर्व विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. शालेय शिक्षणातही अनुकूल बदल करण्यात येत आहेत.
केंद्र सरकारचे कामगार विषयक धोरणाची राज्यात अंमलबजावणी होत असून राज्यातील कामगारांच्या हिताचे काही मुद्दे असल्यास शासनस्तरावर त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. परिषदेतील चर्चेत उपस्थित झालेल्या मुद्द्यांबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे नमूद करून सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे पाटील यांनी याप्रसंगी अधोरेखित केले.