महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने आपल्या शाळेच्या परिसरात साकारलेल्या प्राचीन भारताचा त्रिमितीय नकाशाचे चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अनावरण

43

पुणे :  महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने आपल्या शाळेच्या परिसरात प्राचीन भारताचा त्रिमितीय नकाशा प्रतिमा रुपात साकारला आहे. या नकाशाचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आपला देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. त्यामुळे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत आपल्या देशाला वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभली आहे. या वैभवशाली इतिहासाची ओळख विद्यार्थी जीवनातच व्हावी, यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने आपल्या शाळेच्या परिसरात प्राचीन भारताचा त्रिमितीय नकाशा प्रतिमा रुपात साकारला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. पाटील यांचे मंत्रिमंडळातील सहकारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांनी या नकाशाचे अनावरण केले.

यावेळी रा. स्व. संघाचे क्षेत्रीय प्रचारक अतुलजी लिमये, क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, पश्चिम प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांच्या सह संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आणि विद्यार्थीनी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.