पुणे : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान, भाजपा कोथरुड मंडल कार्यालयात विश्वकर्मा लाभार्थ्यांसोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदीजींचे आजचे विचार ऐकले.
यावेळी सर्व देशवासीयांना आगामी सणांच्या शुभेच्छा देताना, व्होकल फॉर लोकलचा मंत्र माननीय मोदीजींनी दिला. तसेच भारतीय वस्तूंची खरेदी करण्याचं आवाहन देखील यावेळी मोदीजींनी देशवासीयांना केले. याचसोबत अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’चे अमृत कलश राजधानी दिल्लीत पोहोचत असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला.