केवळ गृहिणी ही कोणत्याही महिलेची ओळख नसावी, त्या उद्यमशील असाव्यात हा माझा नेहमीच प्रयत्न – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदार संघातील माता भगिनींना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी पाषाणमध्ये दीपावली महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाला चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी भेट दिली.
केवळ गृहिणी ही कोणत्याही महिलेची ओळख नसावी, त्या उद्यमशील असाव्यात हा माझा नेहमीच प्रयत्न असल्याचे पाटील यांनी यावेळी म्हटले. दिवाळीचे औचित्य साधून माझ्या कोथरुडमधील माता भगिनींनी तयार केलेल्या वस्तूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावेत, यासाठी पाषाणमध्ये दिपावली महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात अनेक महिलांनी दिवाळीसाठी तयार केलेली उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, त्यांचा हा उत्साह पाहून प्रचंड आनंद झाला. या महोत्सवास भेट देऊन माझ्या माता भगिनींनी तयार केलेली उत्पादने खरेदी करून त्यांना प्रोत्साहित केले. तरी, कोथरुड मधील सर्व नागरिकांनी देखील या महोत्सवाला नक्की भेट द्यावी असे चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले.