चंद्रकांत पाटील यांची कोथरूड मध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमाला हजेरी… स्पर्धेतील विजेत्या महिलांचा पारितोषिक देऊन केला गौरव

22

पुणे : कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजपा महिला मोर्चाच्या स्वातीताई मोहोळ यांच्या माध्यमातून महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावत स्पर्धेतील विजेत्या महिलांचा पारितोषिक देऊन गौरव केला.

स्वारद फाऊंडेशन संस्थापिका सौ. स्वाती शरद मोहोळ यांच्या तर्फे होम मिनिस्टर चला पैठणी मिळवूया बक्षिसे जिंकूया  हा कार्यक्रम गेले ३ वर्षा पासून कोथरूड मधील प्रभाग क्रमांक ११ मध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येतो. या वर्षीही अगदी जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला. चंद्रकांत पाटील यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धेतील विजेत्या महिलांचा पारितोषिक देऊन गौरव केला. यावेळी काही मुलींनी सादर केलेल्या स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके पाहून पाटील याला अतिशय आनंद झाला.

Get real time updates directly on you device, subscribe now.