पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतून संकलित झालेली माती घेऊन जाणाऱ्या रेल्वेला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दाखवला हिरवा कंदिल 

11

पुणे : स्वातंत्र्यसैनिक आणि शूरवीरांच्या स्मरणार्थ मेरी माटी मेरा देश या मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणांहून संकलित केलेली माती असलेला अमृत कलश रविवारी दिल्लीला रवाना झाला. रविवारी सकाळी १० वाजता पुण्याहून दिल्लीसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा रेल्वेला हिरवा कंदिल दाखवण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी मातृभूमीला वंदन करण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ चा नारा दिला. याच संकल्पाच्या माध्यमातून देशभरातील माती संकलित करून राजधानी दिल्लीत अमृतवाटिका साकारण्यात येणार आहे. याचसाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतून संकलित झालेली माती घेऊन आज सर्व कार्यकर्ते राजधानी दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

यावेळी आमदार सुनील कांबळे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे उपस्थित होते. २१ डब्यांची हि रेल्वे असल्याची माहिती देण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी पुणे रेल्वे स्थानकावर  सर्व कार्यकर्त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.