मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक संपन्न ; मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत

32
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपस्थित राहिले. आजच्या या बैठकीत मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय ठराव संमत करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत असे नमूद करण्यात आले. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे. हे पण लक्षात घेणे आव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री जयंत पाटील, नाना पटोले, सुनील तटकरे, अनिल परब, सुनिल प्रभू, आशिष शेलार, राजेश टोपे, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, राजू पाटील, कपिल पाटील, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, डॉ प्रशांत इंगळे, कुमार सुशील, बाळकृष्ण लेंगरेश्यक आहे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते  मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असेही आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत केले.
याप्रसंगी, आदी उपस्थित आहेत. याशिवाय मुख्य सचिव मनोज सौनिक, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.