भविष्यातही माझ्या कोथरूडमधील माता भगिनींच्या सर्वंकष उत्कर्षासाठी प्रयत्नशील राहण्याची मी ग्वाही देतो – चंद्रकांत पाटील

मुंबई : महिलांच्या प्रगतीमुळेच देशाची प्रगती होत असून ही प्रगती साधण्यासाठी शिक्षण हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. म्हणून देशातील मुलींचा शिक्षण क्षेत्रातील आकडा वाढता असावा, त्यांनी प्रगती करावी यासाठी “बेटी बचाओ बेटी पढाओ” सारखा कार्यक्रम मोदी सरकारने संपूर्ण देशभरात यशस्वीरीत्या राबविला आहे. यानुषंगानेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे असा नेहमीच आग्रह धरला . यासाठी शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पाटील हे नेहमी प्रयत्नशीलही असतात.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, आज अतिशय होतकरू पण श्रवण समस्येमुळे अडचणींचा सामना करणाऱ्या माझ्या कोथरुड मधील केळेवाडी भागात राहणाऱ्या संस्कृती भंडारी या ११ वर्षीय विद्यार्थ्यांनीला लोकसहभागातून श्रवणयंत्र उपलब्ध करून दिली. आज हे श्रवणयंत्र मिळाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच समाधान देणारा होता.
संस्कृती ही शिकण्यासाठी धडपडत होती. मात्र, श्रवण समस्या ही तिच्या वाटेतील अडचण ठरत होती. त्यात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिच्या परिश्रमाला बळही मिळत नव्हते. संस्कृतीची शिकण्याची जिद्द आणि धडपड ज्या वेळेस मला समजली त्याचप्रसंगी तिला तात्काळ मदत करण्याचे ठरविले होते. भविष्यातही माझ्या कोथरूडमधील माता भगिनींच्या सर्वंकष उत्कर्षासाठी प्रयत्नशील राहण्याची मी ग्वाही देतो