राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (पी.एम.उषा) योजनेचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (पी.एम.उषा) योजनेचा आढावा घेतला. यावेळी अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. दरम्यान, पी.एम.उषा योजनेतील सर्व घटकांतर्गत प्राप्त प्रस्तावांना केंद्र शासनाकडे पाठवण्यात येईल असे देखील त्यांनी नमूद केले.
तसेच या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील आय.एल.एल विधी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक यांच्या अडचणींबाबत देखील माहिती समजून घेतली.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, रुसाचे संचालक निपुण विनायक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.