बेडेकर यांनी पारंपारिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायात स्वतःचा ठसा उमटवून मराठी उद्योजकांसमोर आदर्श निर्माण केला – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

33

मुंबई : लोणची , पापड, मसाले यामध्ये प्रसिद्ध असे नाव म्हणजे बेडेकर. महाराष्टात या खाद्य व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले व्ही. पी. बेडेकर आणि सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत  मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील अतुल बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. बेडेकर यांनी लोणची, मसाले व चटणी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायात स्वतःचा ठसा उमटवून मराठी उद्योजकांसमोर आदर्श निर्माण केला.त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली ! या कठीण प्रसंगी ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ प्रदान करो हीच प्रार्थना !
बेडेकर यांनी देश आणि विदेशात मसाले, लोणचे, पापड यांच्या माध्यमातून घराघरात स्थान निर्माण केले आहे. या उद्योग समूहाच्या चौथ्या पिढीचे अतुल प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी आपल्या धडाडीने या उद्योग समूहात काळानुरुप बदल घडवून ते अधिक नावारूपाला आणले.

Get real time updates directly on you device, subscribe now.