चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; बाणेर पश्चिम, सूस-म्हाळुंगे आणि पाषाण मधील पाच हजार पेक्षा जास्त कुटुंबांना महानगर गॅसची व्यवस्था उपलब्ध

51

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्या कोथरुड मतदारसंघातील बाणेर पश्चिम, सूस- म्हाळुंगे आणि पाषाण येथील सोसायटी भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची महानगर गॅसची मागणी पूर्ण करण्यासाठी पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने जवळपास पाच हजार पेक्षा जास्त कुटुंबाना आता तेथे गॅसची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅसला डीआरएस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी जागेची आवश्यकता होती. या उपलब्धीसाठी महापालिका आयुक्तांशी चर्चा करुन महापालिकेची जागा उपलब्ध करुन देण्यासाठी केलेल्या सूचनेनुसार महापालिकेने बाणेरमधील टियारा व्हिवा सोसायटी मधील अम्युनिटी स्पेस येथे जागा उपलब्ध करून दिल्याने ही प्रणाली कार्यान्वित होत आहे. यामुळे बाणेर पश्चिम, सूस-म्हाळुंगे आणि पाषाण मधील पाच हजार पेक्षा जास्त कुटुंबांना महानगर गॅसची व्यवस्था उपलब्ध झाली आहे.
हि व्यवस्था उपलब्ध झाल्याने पाटील यांना अतिशय आनंद झाला. बाणेरमधील युथिका सोसायटी येथे पूजन करुन त्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात लोकार्पण केले. भविष्यात देखील बाणेरकरांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहण्याची चंद्रकांत पाटील यांनी खात्री दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.