पुणे : आज धनत्रयोदशी . संपत्तीची देवता श्री कुबेर आणि आरोग्याची देवता धन्वंतरीच्या पूजनाचा दिवस. सर्वत्र आज धन्वंतरीची पूजा करण्यात येत आहे. आज आरोग्य भारतीच्या निमित्ताने कोथरुडमध्ये धन्वंतरी यागाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या यागास उपस्थित राहत सहभाग घेतला.
चंद्रकांत पाटील यांना या यागास उपस्थित राहून आहुती समर्पित करण्याचे भाग्य लाभले. यावेळी पाटील यांनी धन्वंतरी देवतेची मनोभावे पूजा करुन सर्वांना ऐश्वर्य, उत्तम आरोग्य लाभो अशी भगवान श्री धन्वंतरींकडे प्रार्थना केली.