पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून, लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथील कामाची पाहणी केली.
चंद्रकांत पाटील यांनी आज एनडीए मध्ये जाऊन तेथील कामाची पाहणी करून आढावा घेतला. तसेच, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे गेल्या अनेक दिवसांपासून पुतळा उभारणीचे काम सुरु होते. ते आता पूर्ण झाले आहे. विपुल खटावकर यांनी कास्य धातूचा वापर करून हा पुतळा साकारला आहे.