पुणे : सद्या सर्वत्र दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. प्रत्येकजण दिवाळीचा आनंद मनमुरादपणे लुटत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र यंदाची दिवाळी वंचितांसोबत साजरी करण्याचा माझा संकल्प केला आहे. यासाठी आज त्यांनी ईशाळवाडीच्या दुर्घटनेत आपल्या आप्तांना गमावलेल्या मुलांसोबत दिवाळी साजरा केली.
राष्ट्रप्रथम ट्रस्ट, वंदेमातरम संघटना, दशरथ भानगिरे ट्रस्ट, युवा वाद्य पथक ट्रस्टच्या माध्यमातून आज ईशाळवाडीच्या दुर्घटनेत आपल्या आप्तांना गमावलेल्या मुलांसोबत चंद्रकांत पाटील यांनी दिवाळी साजरा केली. खरंतर ईर्शाळवाडीच्या या मुलांच्या जीवनात यंदाच्या दिवाळीत दुःखाची किनार आहे. पण, फराळ आणि खेळाचे साहित्याच्या माध्यमातून या मुलांचे दुःख कमी करण्याची संधी मिळाली. त्यामुळे, आज या मुलांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहणारा आनंद हा पुढील वाटचालीसाठी ऊर्जा-प्रेरणा देणारा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.