अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेली कोल्हापूरची सुवर्णकन्या अनुष्का पाटीलचे चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन
कोल्हापूर : नेमबाजीच्या क्षेत्रातील नवोदित नामवंत नेमबाज आणि कोल्हापूरची सुवर्णकन्या अनुष्का पाटील यांनी आंतरविभागीय नेमबाजी स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. या यशामुळे अनुष्काला नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुष्काचे अभिनंदन केले.