वैकुंठधाम येथे वैकुंठ परिवाराच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन; चंद्रकांत पाटील यांनी या सोहळ्यात सहभागी होऊन, आप्तेष्टांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

7
पुणे : आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक जण सहकुटुंब दिवाळीचा हा सण विलक्षण आनंदाने उत्साहाने साजरा करीत असतो. याच काळात दीपोत्सवाचे सर्वत्र वेगळेच आकर्षण निर्माण झालेले असते. मात्र, या आनंदाच्या क्षणी देखील आप्तेष्टांची आठवण नेहमीच येत असते. त्यांच्या या स्मृतिप्रीत्यर्थ पुणे शहरातील वैकुंठधाम येथे वैकुंठ परिवाराच्या वतीने अनेक वर्षांपासून दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यंदा या दीपोत्सवात सहभाग घेतला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आप्तेष्टांची आठवण यावी यासाठी यंदाच्या वर्षीही दिपोस्तवाचे आयोजन करून आपल्या आप्तेष्टांच्या स्मरणार्थ दिवे लावण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी या नयनरम्य सोहळ्यात सहभागी होऊन, आप्तेष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी संपूर्ण वैकुंठाचा परिसर दिव्याच्या मंद प्रकाशात उजळून निघाला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.