पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला संविधान अर्पण केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्त्वांचा पुरस्कार करणारे भारतीय संविधान चिरायू होवो, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. या निमित्त भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात ‘संविधान सन्मान दौड’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी या उत्सवात सहभाग घेतला.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, चिमुकले तसेच दिव्यांगांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण या संविधान सन्मान दौडमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. चंद्रकांत पाटील यांनी देखील या स्पर्धेत सहभागी होऊन सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारताच्या संविधानाबाबत प्रत्येकालाच माहिती असणे आवश्यक आहे, असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.