‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले पंढरपूरच्या यात्रेचं महत्व;  हा क्षण तमाम महाराष्ट्रवासियांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा – चंद्रकांत पाटील

18

पुणे , २६ नोव्हेंबर : माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न झाला. आजचा हा कार्यक्रम उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधील भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या सह ऐकला.

आजच्या मन कि बात कार्यक्रमाबाबत चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, आपले पारंपरिक सण-उत्सव, यात्रा यांचा उल्लेख करताना त्यांचे महत्त्व मोदीजींनी आजच्या मन की बात मध्ये अधोरेखित केले आहेत. विशेष म्हणजे आपल्या पंढरपूर मधील कार्तिकी यात्रेचा यात आवर्जून उल्लेख केला आहे. राहुल गोडसे यांनी पंढरपूरात विठूच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव कॅमेऱ्यात टिपून माननीय मोदींना पाठवले होते. याचाच उल्लेख करत मोदीजींनी पंढरपूरच्या यात्रेचं महत्व सांगितले. हा क्षण तमाम महाराष्ट्रवासियांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा असल्याचे पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.