पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे नेहमीच आपल्या मतदारससंघात विविध उपक्रम राबवत असतात. चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारामुळे पुणेकरांना अनेक सोयी सुविधा मोफत उपलब्ध होतात. पाटील यांच्याकडून पुणेकरांना नवनवीन कला सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच मेजवानी असते. नुकताच त्यांनी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग मोफत ठेवला होता. आता चंद्रकांत पाटील यांनी प्रेक्षकांसाठी ‘चाणक्य’ या ज्वलंत ऐतिहासिक हिंदी नाटकाचा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केला आहे. अधिकाधिक कोथरुडकरांनी या प्रयोगास उपस्थित राहून चाणक्यनीतीच्या या प्रयोगाचे साक्षीदार व्हा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे कि, इतिहासाचा वारसा असलेल्या पुण्यनगरीत प्रेक्षकांसाठी ‘चाणक्य’ या ज्वलंत ऐतिहासिक हिंदी नाटकाचा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवार, दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी सायं. ६ आणि रात्री ९ वाजता आयोजित केला आहे.
हा प्रयोग पुणेकरांना निशुल्क पाहता येणार असून या प्रयोगाचे पास बाणेर येथील बालेवाडी फाट्याजवळील चंद्रकांत पाटील यांच्या संपर्क कार्यालयात उपलब्ध आहेत. तरी अधिकाधिक कोथरुडकरांनी या प्रयोगास उपस्थित राहून चाणक्यनीतीच्या या प्रयोगाचे साक्षीदार व्हा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
Get real time updates directly on you device, subscribe now.