उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सारसबागेतील गणपती मंदिरात महायाग सोहळ्यात घेतला सहभाग… सर्वांना उत्तम आरोग्य लाभो ही गणरायाच्या चरणी केली प्रार्थना

46

पुणे  : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज पुण्यनगरीचे श्रद्धास्थान असलेल्या सारसबागेतील गणपती मंदिरात महायाग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले.

चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सारसबागेतील गणपती मंदिरात महायाग सोहळ्यात सहभागी होऊन गणरायाची मनोभावे पूजा केली. तसेच सर्वांना उत्तम आरोग्य लाभो ही गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. तसेच, संस्थेच्या सर्व सदस्यांना सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.