सोलापूर : समाजाच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, पत्रकार, छायाचित्रकार यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर यांच्या वतीने आज पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले कि, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, पत्रकार यांचे नेहमीच समाजाच्या विकासात महत्वाचे योगदान असते. एखाद्या शहराचा विकास साध्य करण्यासाठी कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी अतिशय गरजेचा असतो. त्याची योग्यता ओळखून समाजाने नेहमीच साथ दिली पाहिजे. उद्योजक हे रोजगार निर्मितीसह शहराच्या, राज्याच्या आणि देशाच्या विकासात योगदान देत असतात. तर पत्रकार शासनकर्त्यांना योग्य पद्धतीने कारभार करण्यासाठी अंकुश म्हणून काम करत असतात. त्यामुळे हे सर्वही घटक समाजासाठी अतिशय महत्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गार यावेळी पाटील यांनी काढले.
या कार्यक्रमास राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे, कार्याध्यक्ष राजेश टोळ्ये, जिल्हाध्यक्ष मनिष खेत यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.