एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर : सोलापूरसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आज चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील कासेगाव आणि हत्तूर मधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.