अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे विभागीय नाट्य  संमेलनाच्या यशस्वितेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

5
सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे विभागीय नाट्य संमेलन दिनांक २० ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान सोलापूर मध्ये होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूषवावे अशी अपेक्षा शहरातील नाट्य परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सोलापूर दौऱ्यादरम्यान या पदाचा स्वीकार केला.
चंद्रकांत पाटील यांनी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष या पदाचा नम्रपणे स्वीकार करुन, नाट्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. तसेच, स्वागताध्यक्ष नात्याने नाट्य संमेलनासाठी मिळणाऱ्या आमदारांच्या मानधनातून दोन लाख ५१ हजार देणगी देण्याची घोषणा देखील पाटील यांनी यावेळी केली. यासोबतच जुळे सोलापूर मध्ये अद्ययावत सोईसुविधांनी युक्त नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.