चंद्रकांत पाटील आयोजित चाणाक्य नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : भारताच्या वैभवशाली इतिहासातील आचार्य चाणक्य हे अतिशय विद्वान आणि कुशल रणनितीकार होते. त्यांचा जीवन प्रवास नव्या पिढीला व्हावा; या उद्देशाने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मनोज जोशी यांच्या ‘चाणाक्य’ नाटकाचे दोन प्रयोग ८ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते. या नाट्यप्रयोगाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मनोज जोशी यांच्या दमदार अभियानाने भारावून गेलेल्या अनेक नाट्य रसिकांनी नाटकाचे भरभरून कौतुक केले. तसेच, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले.
पुणेकरांचे नाटकप्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे दर्जेदार नाटकांना पुणेकर नेहमीच डोक्यावर घेऊन, उत्स्फूर्तपणे दाद देत असतात. अशा नाटकांची मेजवानी पुणेकरांना मिळावी; यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. यापूर्वी कोथरुड मतदारसंघातील बाणेरमधील नागरिकांसाठी प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाट्य प्रयोगाचे आयोजन केले होते. त्याला बाणेरकरांनीही उत्सफूर्त प्रतिसाद दिला होता.
पुणेकरांना आचार्य चाणक्य यांचे तत्वज्ञान समजावे यासाठी ८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांच्या ‘चाणक्य’ या नाटकाचा सायंकाळी ६ आणि रात्री ९ अशा दोन मोफत प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केला आहे. पुणेकरांनी ही या नाट्य प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अभिनेते मनोज जोशी यांच्या दमदार अभिनयाने प्रभावित झालेल्या अनेक नाट्य रसिकांनी नाटकाला उत्स्फूर्तपणे दाद दिली. तसेच, नामदार पाटील यांनी आयोजित केलेल्या प्रयोगाबद्दल आभारही मानले.