पुणे : आरोग्याची वारी, आळंदीच्या दारी. संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र आळंदी येथे येणाऱ्या वारकरी बांधवांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी आरोग्य सेवा शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या सेवेचा अनेक भाविकांनी लाभ घेतला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली कि, या माध्यमातून वारकरी बांधवांच्या मोफत वैद्यकीय तपासणी करून त्यांचे रिपोर्ट दिले जात आहेत. या आरोग्य सेवेचा असंख्य वारकरी बांधव लाभ घेत आहेत.आपला वारकरी बांधव विठू नामाच्या जयघोषात तहान भूक हरपून तल्लीन होत दर वर्षी आळंदीला येत असतात. कितीही संकटे आली तरी वारी कधी चुकवत नाहीत. अशा या निष्ठावंत वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभणे म्हणजे भाग्यच समजतो असे पाटील यांनी म्हटले.