कोथरुडकरांची विविध दाखल्यांसाठीची फरपट थांबावी यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मोफत महा-ईसेवा केंद्र कार्यान्वित

7

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेसाठी, उत्तम अयोग्यासाठी सदैव तत्पर असतात. कोथरुडकरांना सुकर आयुष्य मिळवून देणे हे माझे ध्येय असल्याचे पाटील नेहमीच म्हणतात. त्यामुळे, त्यांच्या सेवेसाठी कार्यरत राहणे मी माझे कर्तव्य समजतो, असे पाटील यांनी म्हटले आहे. याच कर्तव्यपूर्तीसाठी त्यांनी कोथरूडमध्ये मोफत महा-ईसेवा केंद्र कार्यान्वित केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, कर्तव्याच्या जाणिवेतून कोथरुडकरांची विविध दाखल्यांसाठीची फरपट थांबावी यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून काल मंगळवार १२ डिसेंबर २०२३ पासून माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून महा-ईसेवा केंद्र कार्यान्वित केले आहे. या केंद्राचा अनेकजण लाभ घेत असल्याचेही ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.