जनहित तसेच विकासाची कामे करताना लोकप्रतिनिधींना कायदे, नियम याची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक – संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील

12
नागपूर : आज नागपूर येथे ‘लोकप्रतिनिधींची स्वतःच्या मतदार संघाविषयी कर्तव्ये आणि विकास कामांचे नियोजन’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ५० व्या संसदीय अभ्यास वर्गास उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संसद, विधिमंडळात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदार संघातील प्रश्नांबरोबरच राज्याच्या प्रश्नांची जाण असणे आवश्यक आहे. जनहित तसेच विकासाची कामे करताना लोकप्रतिनिधींना कायदे, नियम याची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते.
संसद, विधिमंडळामध्ये काम करणारा लोकप्रतिनिधी हा लोकांच्या वतीने काम करणारा प्रतिनिधी असतो. त्यांना लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाली असल्याने निवडणुकीनंतर लोकांचा नेता म्हणून पक्ष विरहित काम केले पाहिजे. लोकांच्या मनावर राज्य करणे हे चांगल्या लोकप्रतिनिधींचे लक्षण आहे. जनसामान्यात चुकीचा  संदेश जावू नये यासाठी सदैव दक्ष राहिले पाहिजे. यासाठी मतदारसंघात उत्तम काम करणारी त्याची टीम असणेही आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.