पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने ७ हजार ५०० पुस्तकांनी भारत हा शब्द लिहून केला नवा रेकॉर्ड…  चंद्रकांत पाटील यांनी संयोजकांसह सर्वांचे केले अभिनंदन

18

पुणे : नॅशनल बुक ट्रस्ट आयोजित ‘पुणे पुस्तक महोत्सवाच्या’ निमित्ताने पुण्यात आणखी एक विक्रम नोंदविण्यात आला.‌ तब्बल ७५०० ग्रंथसंपदेतून ‘भारता’ चा आकार साकारून पुण्याने हा नवीन विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. यापूर्वी सौदी अरेबियाने ७१९१ पुस्तकांपासून असा जागतिक विक्रम नोंदविला होता. मात्र, पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आता हा विक्रम आपल्या देशाने नोंदविला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आली.

पाटील यांनी पुढे म्हटले कि, या विश्वविक्रमाने पुन्हा एकदा पुण्याची शिक्षणगंगा जगासमोर सिध्द झाली आहे. या विश्वविक्रमाच्या निर्मितीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य होते. चंद्रकांत पाटील यांनी संयोजकांसह सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन आज चंद्रकांत पाटील आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.