डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे पुस्तक महोत्सवाचे उदघाटन संपन्न

19

पुणे : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास तर्फे आणि महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे आज उद्घाटन करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाटील म्हणाले, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आणि पुण्याच्यादृष्टीनेही महत्वाचा असा हा पुस्तक महोत्सव आहे. महोत्सवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक विद्यार्थी आणि पालकांना मोफत देण्यात येणार आहे. चांगल्या गोष्टींमध्ये सहभाग ही पुण्याची संस्कृती असल्याने महोत्सवाला चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमपूर्वी विद्यापीठाच्या परदेशी विद्यार्थ्यांनी त्या-त्या देशाचे नृत्य आणि संगीत सादर केले. पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ या १८ हजार ७५१ पुस्तकांनी ‘जयतू भारत’ हे जगातील पुस्तकांनी बनलेले सर्वात मोठे वाक्य बनवून विश्वविक्रम साकार करण्यात आला. यापूर्वीचा विक्रम ११ हजार १११ पुस्तकांचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे स्वप्नील डांगोरीकर यांनी याबद्दलचा निकाल जाहीर केला व आयोजकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात केले.
कार्यक्रमाला राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक कर्नल युवराज मलिक, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, डेक्कन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद कुंटे, शहीद भगतसिंह यांचे पणतू यादवेंद्रसिंग संधू, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.