प्रत्येकाने निर्वाहन करताना संघटन वाढीसाठी प्रयत्न करावेत, बूथ सशक्तीकरण यावर भर देऊन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे, चंद्रकांत पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

9

पुणे : भारतीय जनता पक्ष कोथरुड मंडलाची नवनियुक्त कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. शनिवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले कि, पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मिळणारे पद ही जबाबदारी आहे. या जबाबदारीचे प्रत्येकाने निर्वाहन करताना संघटन वाढीसाठी प्रयत्न करावेत, बूथ सशक्तीकरणावर भर देऊन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या. यासोबतच २२ जानेवारीचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील पाटील यांनी याप्रसंगी केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष माधवजी भंडारी, कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.