बाबुराव दौंडकर स्मारक संकुलाचे उदघाटन… बाबुरावांचे कार्य पुढे नेताना गावचा विकास, शेतकऱ्यांचा विकास यासाठी स्मारक समितीने प्रयत्न करावेत – चंद्रकांत पाटील

पुणे : जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षाचे विचार पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुजविण्याचे महत्वाचे काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वर्गीय बाबुराव दौंडकर! संस्कारयुक्त ग्रामीण विकास हा बाबुरावांचा विचार होता. बाबुरावांचा हाच विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शिरुर मधील रांजणगाव येथे बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीने संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलाचे उद्घाटन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भागय्याजी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.