पुणे पुस्तक महोत्सवात चंद्रकांत पाटील यांना एका कलाकार तरुणीकडून रेखाचित्र भेट… या अनोख्या भेटीबद्दल पाटील यांनी तरुणीचे मनापासू मानले आभार

पुणे : चित्रकला हा अनेकांचा आवडीचा कलाप्रकार. लहानपणी जडलेला हा छंद भविष्यात अनेकांसाठी करिअर बनतो. त्यातूनच अनेक प्रतिभावंत चित्रकार तयार होतात. अशीच प्रतिभा लाभलेली एक तरुणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुरुवारी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भेटली. तिने पाटील यांना एक रेखाचित्र भेट दिले.