पुणे महापालिकेच्या ९३ रजा मुदत शिक्षकांना सेवेत कायम करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ३१ डिसेंबर पूर्वी सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्याची ग्वाही दिल्याने या रजा मुदत शिक्षकांचा दिवाळी प्रमाणे ३१ डिसेंबरचा आनंद द्विगुणित होणार आहे. त्याबद्दल शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयुक्त विक्रम कुमार यांचे शिंदेशाही पगडी देऊन अभिनंदन केले. तसेच, सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांचे अभिनंदन करुन, त्यांना शुभेच्छा दिल्या.