सुरेशनाना नाशिककर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पणा निमित्त आयोजित कार्यक्रमात ७५ कष्टकरी मातांचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान

पुणे : माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आजच्याच दिवशी पुणे शहरातील डेक्कन येथे भव्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारुन त्याचे लोकार्पण अटलजींच्या शुभहस्ते करणाऱ्या माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर यांचा जन्मदिन. ही बाब म्हणजे विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली.