स्व. आमदार दिगंबरभाऊ यांच्या निधनानंतर त्यांच्या संकल्पनेतील मावळ तालुक्यातील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : मावळचे माजी आमदार स्वर्गीय दिगंबर भेगडे यांचा आज प्रथम स्मृतीदिन! यानिमित्त त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीला प्रेरणा देत रहावे यासाठी त्यांचे कुंडमळा इंदोरी येथे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.